Home

|| सीताराम महाराज ||

महाराजांच्या मुंबई मुक्कामात एका मुमुक्षुला महाराजांच्या कृपाप्रसादाची अवीट गोडी चाखावयास मिळाली. सीताराम झिलु मयेकर हे त्याचे नाव. सावंतवाडी संस्थानातील मालवण रस्त्यावरील सुकळवाड येथील हा तरुण चित्रकार व्यवसायानिमीत्त मुंबईस आला गेला. संसाराच्या रामरगाडयाबरोबर रामनामाची धूनही त्याच्या पाठीशी होती. नामस्मरण, भजनाची आवड यामुळे साहजिकच साधु संतांच्या दर्शनाचा छंदही सीतारामच्या मनाला जडला होता. महाराजांच्या पायावर डोके ठेवताच सीताराम ब्रम्हतन्मय स्थितीत जवळजवळ दिड घटका होता. “बाळ नारायणा स्वस्वरुपाच्या चिंतनात नारायण नामोच्चाराने अखंड आनंदाचा सतत स्वाद घे.” महाराजांनी आशिर्वाद दिला. “हे देवाधिदेवा, आपणच नारायण स्वरुप आहात मी ही त्याचाच अंश असून त्याच नारायणत्वाचा सर्वव्यापी प्रत्यय आपले दर्शन घेतल्यापासुन येत आहे. हे गुरुमाऊली ह्या दासानुदासावर कूर्म दृष्टीने कृपा असु द्या.” सीतारामाने प्रसादाची पावती दिली. महाराज हसुन म्हणाले, “रंगसंगती तर उत्तम जमली आहे. विसंगती कुठे दिसत नाही. सप्तरंगांच्या विलक्षण “रंगसंगतीने अविस्मरणीय व सर्वसुंदर चित्र तयार होते. पण त्याहीपुढे जाऊन सप्तरंगांच्या विलक्षण मिश्रणाने प्रकाशाचा रंग तयार होतो. प्रकाशरुप परमात्मा तुझे सर्व जीवन अध्यात्म प्रकाशमान करो. सप्तस्वराच्या लयीत परमात्म्याच एक सुर लागो. सुधामृत सागरात श्रीगुरु माऊलीचे बोट धरुन अथांगतेचा व अनंतत्वाचा अनुभव घेत असल्याचे सीतारामाला जाणवले. पुन्हा एकदा सदगुरुंचे पाय धरुन चरणधुळ मस्तकाला लावली. व चित्रकार आत्मचरिज्ञ होऊन बाहेर पडला. घरी परततांना सीताराम महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाने पुर्णपणे भारावुन गेला होता. सीतारामला अंतरीची खुण पटली होती. सीताराम संसारात राहुनही ब्रम्हनंदात राहण्यासाठी पुढे वाटचाल करु लागला.

A homepage section

This is an example of a homepage section. Homepage sections can be any page other than the homepage itself, including the page that shows your latest blog posts.

About

You might be an artist who would like to introduce yourself and your work here or maybe you’re a business with a mission to describe.

Contact